मुणगे येथील महाजन बंधूंचा देवीचा गजर घालतोय भजन रसिक नामांकित बुवांना भुरळ

डोंगर माथ्यावर आई तुझ मंदिर उभी हाय ओढ्याच्या बाजूला बायची माय भक्त तुझ्या येती भेटीला
मुणगे येथील राम शाम या जुळ्या महाजन बंधूंनी मुणगे बांबरवाडी येथील बायची देवी नुतन मंदिर कलशारोहण सोहळ्यात स्वरचित सादर केलेल्या बायची देवीवरील गजराने भजन रसिकांना भुरळ घातली आहे.
मुणगे येथील महाजन बंधू भजन कलावंत म्हणून सुपरिचित आहेत.ते भगवती देवीच्या पालखी सोहळ्यात आपली गायन कला सादर करीत असतात.बांबरवाडी येथील बायची मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भजन सेवा करताना डोंगरमाथ्यावर आई तुझ मंदिर हा गजर सादर केला.
सदर गजराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि भजन रसिकांबरोबरच प्रथितयश भजनी बुवांनीही महाजन बंधूंचे कौतुक केले आहे.यात बुवा भगवान लोकरे,प्रमोद हर्याण,अजित मुळम,श्रीधर मुणगेकर, प्रकाश पारकर,दुर्वास गुरव,प्रमोद धुरी, संतोष शिर्सेकर, संतोष शितकर,सुशिल गोठणकर, संतोष जोईल अशा अनेक बुवांनी त्यांच्या गजराचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!