बाळ गोपाळ हनुमान मंदिरात १२ रोजी हनुमान जयंती उत्सव

कणकवली : शहरातील कांबळीगल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधीस्थान येथे शनिवार १२ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.
सकाळी ६.४५ वा. हनुमान जन्मोत्सव, ८ वा. श्रींची पूजा, अभिषेक, तीर्थप्रसाद, ९.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. श्रींची महाआरती, तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, रात्री ८.१५ वा. बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ प्रस्तुत जल्लोष २०२५ सोहळ्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर नृत्यांचा कलाविष्कार सादर होणार आहेत. यानिमित्त रसिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळ गोपाळ हनुमान मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!