खारेपाटण गट विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या वतीने खरीप हंगाम सन २०२५ – २६ च्या अल्प शेती कर्ज वाटपाचा शुभारंभ

सुमारे २ कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात येणार
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील तसेच आजुबाजूच्या दशक्रोशीतील शेतकरी बांधव नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेली खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेच्या सन २०२५ – २६ च्या खरीप हंगाम अल्प मुदत शेती कर्ज वाटपाचा शुभारंभ आज संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री सुरेंद्र कोरगावकर, संचालक श्री विजय देसाई,भाऊ राणे,मोहन पगारे,संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले,मनोहर गोसावी,संस्थेचे सभासद श्री संतोष पाटणकर श्री मंगेश तेली,अल्लाउद्दीन पावसकर, ज्ञानदेव पतयान,लक्ष्मण घेवडे, अशोक फाटक,प्रकाश बाणे, पद्माकर नवरे,सूर्यकांत सावंत, हरीचंद्र पतयान आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या शेतकरी सभासद बांधवांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती कर्ज वाटप करणारी खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण पहिली संस्था ठरली असून आज कर्ज वितरण शुभारंभ प्रसंगी सुमारे २० शेतकरी कर्ज बांधवांना प्रथम.कर्ज वाटप करून कर्ज वितरण वाटपाचे धानादेश त्यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.तसेच संस्थेच्या वतीने यावेळी सन २०२५ -२६ आर्थिक वर्षांकरिता सुमारे २ कोटी रूपये एवढी कर्ज रक्कम संस्था सभासदांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र जठार यांनी दिली.
तसेच संस्थेच्या सन २०२४ -२५ वर्षांत एकूण ४३१ सभासदना कर्ज वितरीत करण्यात आले होते.यापैकी ३८९ सभासदांनी नियमित कर्ज भरून संस्थेला सहकार्य केले.ज्या कर्जदारांनी दिलेल्या मुदतीत कर्ज फेड केले तर अशा सभासदांना श्री पंजाब राव देशमुख कर्ज सवलत योजनेचा लाभ मिळत असल्याचे संस्थेचे सचिव श्री अतुल कर्ले यांनी यावेळी सांगितले.