वायंगणी येथे जिवंत ७/१२ मोहीमे अंतर्गत चावडी वाचन उपक्रम संपन्न …..

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या दि.१९ /३/२०२५ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील मयत व्यक्तींची नावे कमी करून त्यांच्या जागी त्यांच्या वारसांची नावे लावण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात नुकताच जिवंत ७/१२ मोहीम अंतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम वायंगणी येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाला तलाठी विकास चाळके, उपसरपंच प्रताप फाटक, पोलिस पाटील-निलेश कदम, ग्रामपंचायत सदस्य- सविता सुतार, शमिका सुतार, भाग्यश्री बाणे, भारती परब, संभाजी बाणे, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या चावडी वाचन कार्यक्रमास वा्यंगणी गावातील सातबारा खातेदारांची नावे व त्यातील मयत व्यक्तींची नावे तलाठी श्री विकास चाळके यांनी चावडी वाचनात ग्रामस्थांना वाचून दाखवली.तसेच शासनाच्या जिवंत ७/२२ मोहीमचा उद्देश स्पष्ट केला. चावडी वाचन करून मयत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी व वारसांची नावे लावण्यासाठी हा शासनाने उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून शासन राबवित असलेली जिवंत ७/१२ मोहीम का ? आवश्यक आहे.हे सांगितले.तर नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या सात बारा वरील मयत व्यक्तीची नावे कमी करून आपल्या वारसांची नावे लावून घ्यावीत असे आवाहन केले.
तलाठी विकास चाळके यांनी ग्रामस्थांना ७/१२ विषयी माहिती दिली.यावेळी घेण्यात आलेल्या चावडी वाचन कार्यक्रमास मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!