पोलिस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तलाठी विकास चाळके यांचा वायंगणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार

तलाठी विकास चाळके हे नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने वायंगणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने चाळके यांचा सत्कार करण्यात आला.आदिनाथ मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष संदेश कदम यांच्या हस्ते चाळके यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी वायंगणी ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रताप फाटक, पोलिस पाटील -निलेश कदम, सदस्य -संभाजी बाणे, सविता सुतार, शमिका सुतार, भाग्यश्री बाणे, भारती परब, आदिनाथ मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष संदेश कदम, ग्रामपंचायत चे अन्य कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विकास चाळके हे नडगीवे या गावी ऑगस्ट -2024 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाले.तलाठी या सेवेत असताना आपले कर्तव्य पार पाडत नागरिकांना उत्तम सेवा देत.त्याचा एम. पी. एस. सी. चा पोलीस उपनिरीक्षक चा अभ्यास देखील सुरु होता.त्यांचे मूळ गांव कोदळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि शिक्षण शिक्षण; मेकॅनिकल इंजिनीअरींग डिप्लोमा व बी.ए.(राजकारण शास्त्र व इतिहास) असे झाले असून एका सर्वसामान्य परिवारातील सदस्य आहेत.विकास चाळके यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचा वा्यंगणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.25मार्च रोजी हा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात विकास चाळके यांनी यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.