मेढा येथे २० रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव दि. २० मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त चौकचार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून दिवसभरात पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे तर रात्री सामूहिक गाऱ्हाणे घातले जाणार आहे. रात्री १० वा. पारंपारिक घुमट वादन व कलावंतीण नृत्य, रात्री ११:३० वा. देवगड किंजवडे येथील पावणादेवी ग्रुपच्या महिलांचे समई नृत्य सादर होणार आहे. तसेच स्थानिक लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स होणार आहेत. त्यानंतर ‘छावा’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच या उत्सवानिमित्त दि. २३ मार्च रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी मांड उत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.