वेंगुर्लेत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा..

दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड वाटप शिबिरात १५० दिव्यांगांचा सहभाग..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
भाजपा वेंगुर्ले च्यावतीने माजी खासदार व भाजपा सरचिटणिस निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड वाटप शिबिराचा १५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन नुकतेच भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे जयपूर फूट बसविण्यात आलेल्या अनामिका अनिल शिरोडकर व मनिषा नारायण रेवणकर या दिव्यांगांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे सकाळी १०.३० वाजता दीव्यांग आघाडी व भाजपा वेंगुर्ले च्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्था आयोजित दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अनामिका रेडकर व मनिषा रेवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा १५० दिव्यांगानी लाभ घेतला.
यावेळी प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, मनवेल फर्नांडिस, खरेदी विक्री संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, बाळा सावंत, कमलेश गावडे, विजय रेडकर, सायमन आल्मेडा, पपू परब, तृषार साळगावकर, शरद मेस्त्री, रमेश नार्वेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, शितल अंगचेकर, कृपा मोंडकर, सारिका काळसेकर, आकांक्षा परब, अंकीता देसाई, अण्णा गवंडे, मानसी परब, सत्यविजय गावडे, दाजी परब, कावेरी गावडे, बिटू गावडे, समिर कुडाळकर, प्रणव वायंगणकर, पुडलिक हळदणकर, नितीन परब, धर्मराज कांबळी, डॉ. पवार मॅडम , शैलेश जामदार तसेच साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे शामसुंदर लोट , भरत परब , प्रशांत केळुसकर उपस्थित होते .
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी , वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप भगत , डॉ. रूपाली पाटील , डॉ. शाम राणे , फिजिओथेरेपिस्ट दिपा पिरणकर , मनाविकृती समोदेशक रेश्मा भाईप , स्पिचथेरीपीस्ट श्रीधर पोवार , नेत्रचिकीत्सा अधिकारी एम.एस.माकार , पुनम गावडे यांनी तपासणी केली.

error: Content is protected !!