डॉ. चंद्रकांत राणे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव
मराठा समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या व समाजाच्या हितासाठी सदैव झटत राहणाऱ्या कणकवलीतील प्रथितयश डॉ. चंद्रकांत राणे यांचा नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने कणकवली मराठा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानपत्र व शाल श्रीफळ देत हा सत्कार करण्यात आला. यावेळी एस टी सावंत जी ए सावंत व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.