जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची पुस्तकांच्या गावाला भेट

पोंभुर्ले येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आलेले जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालपे येथील पुस्तकांच्या गावाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लेखका प्रमाणे वाचकांसाठी पुस्तक वर्गवारी करण्याच्या सुचना व्यवस्थापकांना केली. जेणेकरून उपलब्ध पुस्तकांबद्दल भेट देणारयांना माहिती मिळू शकेल. यावेळी त्यांच्या सोबत देवगड तहसीलदार आर जे पवार,पाटगांव मंडल अधिकारी जनार्दन साईल,पोंभुर्ले तलाठी सुनीता मेस्त्री,तसेच गीता मालपेकर, व्यवस्थापक महेश वेदरकर,ओंकार जोशी,प्रथमेश आसोलकर,पोंभुर्ले कोतवाल प्रकाश घाडी, पाटगाव कोतवाल विवेक भोगटे,फणसगाव कोतवाल संतोष महाडीक आदी उपस्थित होते.यावेळी पाटगांव मंडल अधिकारी साईल यांनी जिल्हाधिकारी यांना पुस्तक भेट दिले.

error: Content is protected !!