श्री देव महापुरुष मंदिराचा उद्या 24 वा वर्धापनदिन

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

महापुरुष मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

शहरातील बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराचा 24 वा.वर्धापन दिन शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ५.०० वाजता काकड आरती,सकाळी ८.०० वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक,९.०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा १२.३० वाजता आरती दुपारी १.०० ते ३.०० वा.पर्यंत महाप्रसाद सायंकाळी ४.०० वाजल्यापासून सुश्राव्य भजने तसेच सायंकाळी ७.०० वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ शिरवल कणकवली यांचा अजिंक्यमणी हा महान पौराणिक नाट्य प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन व्यवस्थापक महापुरुष मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!