अखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

पालकमंत्री नितेश राणेंकडून कालच्या अपघातानंतर प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना
हळवल फाट्यावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश
महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी काल गुरुवारी रात्री अपघात झाल्यानंतर तब्बल दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरल्याची घटना घडली होती. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले त्यानंतर रास्ता रोको करणाऱ्या संतप्त जमावाने येथील अपघात रोखण्यासाठी वारंवार उपाययोजनांची मागणी करून देखील उपाययोजना होत नसल्याने आक्रमक भूमिका घेतली होती. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गड नदी ब्रिज पासून महामार्गावर रम्बलर लावण्याचे काम आज शुक्रवारपासून हाती घेण्यात आले. जेणेकरून पुलावरून वागदे च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊन अपघात टाळावेत या दृष्टीने या उपायोजना तातडीने करण्यात आल्या. पालकमंत्री नितेश राणे यांनी या अपघातग्रस्त स्पॉटची गांभीर्याने दखल घेतली असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली