शिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

विविध स्पर्धांचे करण्यात आले आहे आयोजन
शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने कलमठ बाजारपेठतील श्री देव काशीकलेश्वर मांड येथे बुधवार 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिली ते चौथी गटासाठी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग हे विषय आहेत. या गटासाठी अनुक्रमे 701 रुपये, 501 रु., 301रु., महाराजांच्या जीवनावरील एक पुस्तक व प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. पाचवी ते आठवी गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड-किल्ल्यांचे जतन व काळाची गरज हे विषय आहेत. या गटासाठी अनुक्रमे 1,001 रु , 701 रु,, 501 रु. महाराजांच्या जीवनावरील एक पुस्तक व प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. त्यानंतर एसएसएस योद्धा पथक, बिडवाडी हे मर्दानी खेळांचे सादरीकरण करणार आहे.त्या नंतर दुपारी 2 ते 6 या वेळेत 15 वर्षा खालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा होणार आहेत,त्याच अनुक्रमे बक्षीस 701/- ,501/- व 301/- राहील..
*सायंकाळी 6 वा.जोर मारणे स्पर्धा होणार आहे. याकरिता अनुक्रमे 1,001 रु.,701 रु., 501 रु., उत्तेजनार्थ 251 रु. अशी बक्षीसे आहेत. बैठका मारणे स्पर्धा होणार आहे. याकरिता अनुक्रमे 1,001 रु., 701 रु.,501 रु., उत्तेजनार्थ 251रु. व प्रमाणपत्र अशी बक्षीसे आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी सुशांत राऊळ ( 9405781296), नितीन पेडणेकर, धीरज मेस्त्री, नितीन मेस्त्री, अनुप वारंग , प्र.वि.कांबळे, सिकंदर मेस्त्री,सागर गावडे,नितेश भोगले,प्रदीप सावंत यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.