राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व ॲड. विराज भोसले यांचा मंडळाच्या वतीने सत्कार

कणकवली येथे माऊलीनगर मित्रमंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माऊलीनगर मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल जाधव, संतोष जाधव, सूर्यकांत जाधव, नमानंद मोडक, रमेश जाधव, विजय जाधव, संतोष जाधव, मंगेश जाधव आदी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!