कणकवली आचरा मार्गाचे काम दर्जेदार करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी

सुमारे 4.50 कि.मी. चे काम होणार काँक्रिटीकरण

कणकवली आचरा मार्गाचे काम सुरू करण्यात आले असून सुमारे 4.50 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यावर्षी आंगणेवाडीत जाणाऱ्या भाविकांना या मार्गावरून जाताना त्रास होणार असल्याची वृत्त कोकण नाऊच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेत याबाबत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना या रस्त्याच्या कामाची पाहणी करून आंगणेवाडी जाणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्या अशा सूचना दिल्या. त्यानुसार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली. तसेच काँक्रिटी करणा च्या एका लेनचे काम सध्या सुरू असून जरी हे काम आंगणेवाडी यात्रेपूर्वी पूर्ण झाले नाही तरी या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने सध्या कार्यरत असलेल्या रस्त्याची डागडुजी तसेच या रस्त्यावरील धुळीवर पाणी मारण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अजयकुमार सर्वगोड यांनी दिली. वरवडे चव्हाण दुकान ते पिसेकामते येडोबा देवस्थान पर्यंत हा रस्ता काँक्रिटीकरण होणार आहे. या रस्त्याचे काम करत असताना भविष्यात अनेक वर्षे हे काम टिकावे या दृष्टीने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे या कामावर जातींनिशी लक्ष ठेवून आहेत. त्यातच वरवडे नदीवरील पुलाचे काम देखील सध्या युद्धपातळीवर सुरू असून, या पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जात आहे. या कामाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील काम दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली.

error: Content is protected !!