खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न….

प्रधानमंत्री पोषण शक्ती पाककृती केंद्रीय योजना – २०२५ अंतर्गत खारेपाटण केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन नुकतेच येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली व केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
खारेपाटण केंद्रात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळासाठी घेण्यात आलेल्या या माता पालक पाक कलाकृती स्पर्धेचे उद्घघाटन खारेपाटण हायस्कूलच्या माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ योगिनी रानडे मॅडम यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.तर या स्पर्धेला खारेपाटण येथील प्रसिद्ध डॉ.सचिन पारकर, खारेपाटण केंद्र शाळेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे, खारेपाटण संभाजी नगर टाकेवाडी जि.प.शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ मानसी महेंद्र गुरव,रामेश्वर नगर शाळेच्या सौ जान्हवी प्रशांत सुतार,सौ उज्ज्वला संगप्पा गुरव, नडगिवे नं.१ शाळेच्या संजीवनी सतीश कर्ले,नडगिवे शाळा क्र.२ च्या सौ सुचिता सुरेंद्र गुरव,व खारेपाटण केंद्र शाळेच्या सौ दीपा जोतीराव लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या शिक्षिका श्रीम.आरती जोजेन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या स्पर्धेत खारेपाटण येथील रामेश्वर नगर जि.प.शाळा, संभाजी नगर गुरववाडी जि.प.शाळा
नडगिवे नं.१ जि.प.शाळा,नडगिवे जि.प.शाळा क्र.२ व खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ या शाळांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे संपूर्ण परीक्षण डॉ.सचिन पारकर व सौ योगिनी रानडे मॅडम यांनी केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने सौ योगिनी रानडे मॅडम व श्री संतोष पाटणकर यांनी शालेय पोषणाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.तर स्पर्धक महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीम.अलका मोरे,समिधा राऊत, शीतल राठोड,आरती जोजेन,अबीदा काझी,श्री धुमक सर आदींनी सहकार्य केले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.