खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला सिंधुदुर्ग डायट चे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी दिली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा सिंधुदुर्ग अर्थात डायट या संस्थेचे प्राचार्य प्रा.राजेंद्र कांबळे यांनी नुकतीच मंगळवार दी.१२ रोजी कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला आकस्मित सदिच्छा भेट दिली.व शाळेची पाहणी केली.
यावेळी भेटी दरम्यान त्यांच्यासमवेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रा.कांबळे सर, प्रा.जाधव सर,आणि कणकवली येथील सर्व शिक्षा अभियान तथा बी आर सी या संस्थेच्या श्रीमती परुळेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी डायट चे प्राचार्य प्रा.राजेंद्र कांबळे यांचेसह उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा असून नुकतीच खान अकॅडमी पुणे या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता चाचणीत राज्यातील टॉप १० शाळांमध्ये यश संपादन केल्याबद्दल या शाळेचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यासाठी आपण येथे असल्याचे डायट चे प्राचार्य प्रा.राजेंद्र कांबळे यांनी यावेळी सांगितले.
तर या भेटी दरम्यान जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या टीम च्या वतीने शाळेच्या एकूण कामकाजाची तपासणी करण्यात आली.व काही सूचना शिक्षकांना करण्यात आल्या. तसेच वर्गावर प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी केलेल्या सूचनांचा आदर करून येणाऱ्या पुढील काळात शाळा शालेय विद्यार्थी गुणवत्ता वाढी बरोबरच सहशालेय उपक्रमांसह भौतिक सोयी सुविधांमध्ये शाळा अव्वल येण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.