दारिस्ते गावांमध्ये विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न

माजी जि. प.अध्यक्ष संदेश सावंत यांची उपस्थिती
नुकतीच दारिस्ते गावांमध्ये विविध विकासकामांची भूमिपूजने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.त्यामध्ये जलयुक्त शिवार या योजनेतून दारिस्ते गावातील १४ विहिरींना मंजूरी मिळाली आहे.या विहिरीसाठी (१५२८२५०) एक कोटी बावन्न लाख ब्याएशी हजार पन्नास रुपये एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, तसेच वरची वाडी रस्ता सात लाख मंजूर, तसेच सुतारवाडी वरचीवाडी स्मशानभूमी पर्यंत रस्ता सात लाख, गांवकरवाडी रस्ता सात लाख मंजूर,व नमसवाडी पायवाट पाच लाख मंजूर,हूलेवाडी स्ट्रीट लाईट एक लाख मंजूर झाली आहेत.हि सर्व विकासकामे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या सहकार्याने व गोट्या सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहेत, तसेच आज दारिस्ते गावातील सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत ग्रा.सदस्य भाई सावंत, वैष्णवी सुतार,नेहा सावंत, वृषाली कदम व ग्रामस्थ सुरेश गांवकर,बाबी साळसकर, महेश सुतार, गणेश कदम, विनायक गुरव,गोपी सुतार,दाजी शेलार, संजय गांवकर, आण्णा कुबल, गणेश गुरव, विठ्ठल रासम,लक्ष्मण ठाकूर, संतोष देसाई, प्रकाश तांबे,मधू जाधव,भाऊ सावंत,कुशाजी गांवकर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील लोकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेशजी राणे व गोट्या सावंत यांचे मनापासून आभार मानले.