सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर-तालुकाध्यक्षपदी मकरंद सावंत यांची निवड

कणकवली-वैभववाडी संघटकपदी अभिषेक नाडकर्णी

संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या उपस्थित झाली निवड

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका कार्यकारणीची सभा संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे पार पडली. जुन्या कार्यकारणीचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नूतन कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यानुसार तालुकाध्यक्षपदी मकरंद सावंत (शिवडाव) यांची निवड करण्यात आली तर कणकवली-वैभववाडी संघटकपदी अभिषेक नाडकर्णी, तालुका उपाध्यक्षपदी ऋषिकेश जाधव आणि रुजाय फर्नांडिस,सचिव सुशिल परब, सहसचिव यशवंत महाडिक, खजिनदार स्नेहल हजारे-कंचावडे, सहखजिनदार स्वप्निल पाताडे, सदस्य म्हणून अमोल भोगले, सुहासिनी कुलकर्णी, दुर्गाप्रसाद काजरेकर, निकेत पावसकर, देवेन सावंत, मिहीर तांबे, दिनेश अपराध, विनायक पारधिये, मंदार राणे, अजय आचरेकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव 2019 पासून जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य असून गेल्या अडीच वर्षात आजपर्यंत खारेपाटण पंचक्रोशीत 6 रक्तदान शिबिरे त्यांच्या माध्यमातून घेतली आहेत.जिल्हा तसेच कोल्हापूर पासून रक्तदात्याना नियमित तसेच दुर्मिळ रक्तगटाचे रक्त उपलब्ध करून दिले आहे.कारण खारेपाटण हे एका टोकाला असल्याने रक्ताची मागणी असल्यास आधी खूप त्रास सहन करावा लागायचा.राजकीय पदाधिकारी यांना विनंती करून कार्ड उपलब्ध व्हायची.आता ती सुलभ झाली.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून रात्री अपरात्री केव्हाही कार्ड अथवा रक्तदाता उपलब्ध होतो.नूतन कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, ह्यूमन राइट्सचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य कणकवली प्रतिनिधी अमेय मडव आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!