कणकवली आचरा एसटी बस फेरी नियमित सुरू करण्याची मागणी

पिरवाडी येथून सकाळी सहा पंचेचाळीस वाजता सुटणारी कणकवली आचरा बंदर ही एसटी गेले काही दिवस नियमित नसल्याने या गाडीतून जाणारे विद्यार्थी, मच्छी विक्रेते यांना त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत तातडीने गाडी सुरू न झाल्यास आचरा तिठा येथे आंदोलन छेडण्याचा इशारा आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी निवेदनाद्वारे
कणकवली आगार व्यवस्थापकांना दिला आहे .
यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर ग्रामस्थ गौरी सारंग ,मनस्वी तोडणकर, शुभांगी सारंग ,दीक्षा जोशी, सविता जोशी, विशाखा खंवणेकर, रेवती धुरी वसुंधरा कमळे, सुचिता तोडणकर छाया पराडकर यास अन्य ग्रामस्थ उपस्थित होते . कणकवली आचरा बंदर गाडी बंद असल्याने कणकवली रेल्वे स्थानक, कणकवलीबाजार तसेच शालेय विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या गाडीशिवाय या भागातून दुसरी गाडी नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच
हि गाडी उपलब्ध नसल्याने या गाडीचे प्रवाशी तळाशील कणकवली गाडीने प्रवासासाठी गाऊडवाडी येथे गेल्यास
या गाडीचे वाहक प्रवाशांची उद्धट वागतात आणि प्रवाशांना गाडीत चढण्यास मज्जाव करतात.याबाबत संबंधितांना समज देण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!