शेठ न. म. विद्यालयात साजरा होणार पालक कृतज्ञता दिन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा उद्योजक समाजसेवक स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर चे संचालक श्री.रुपेश कोलते यांनी शेठ न.म. विद्यालय खारेपाटण येथे सदिच्छा भेट दिली. सामाजिक बांधिलकी जपताना कोकणात उद्योजक घडावे व कोकणातील तरुणानी व्यवसाय क्षेत्रात यावे यासाठी श्री कोलते यांनी कोकण दौरा आयोजित केला आहे. त्या निमित्ताने ते कोकणातील अनेक शाळा, महाविद्यालयांना भेटी देत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या सत्कार होत आहे ही आपल्या कोकण वासियांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृतीतील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील पहिला दिवस म्हणजेच ‘विद्यार्थी आत्मविश्वास दिन’ याचा प्रसार करण्यासाठी ते आपल्या स्वखर्चाने शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे आणि त्यांना भविष्यात खूप चांगला फायदा होण्यासाठी भारतीय संस्कृतीतील सर्व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी आत्मविश्वास दिन ( Students confidence day) साजरा व्हावा यासाठी ते निस्वार्थीपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शेठ न.म . विद्यालय खारेपाटण ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील विद्यालयाला भेट देऊन तेथील प्राचार्य. श्री. संजय सानप सरांना विद्यार्थी आत्मविश्वास दिनाचे पत्र दिले व हा दिवस साजरा करण्याची विनंती केली सरांनी ही विनंती मान्य केली आणि हा दिवस आमच्या प्रशालेमध्ये साजरा करणार असल्याचे सांगितले त्याबद्दल या दिनाचे संकल्पनाकार अंकुश जोष्टे ठाणे यांनी उद्योजक रुपेश कोलते आणि मुख्याध्यापक संजय सानप सरांचे आभार मानले.
त्यांच्या या कार्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.