खारेपाटण बुद्धविहार येथे शाहीर कल्पना माळी यांचे पोवाडा सादरीकरण
जिल्हा माहिती व जनसंपर्क महासंचलनालय वतीने आयोजन
माहिती व जनसंपर्क महासंचलानालय जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज गुरवारी खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” महीला शाहीर श्रीमती कल्पना माळी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागच्या अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या पहाडी आवाजातून शाहिरी कलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्या.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,उपाध्यक्ष द जितेंद्र कदम,खजिनदार संदीप पाटणकर,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा सौ आकांशा पाटणकर,उपाध्यक्ष सौ पूजा कदम,सचिव सौ आरोही पाटणकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
खारेपाटण बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शाहीर सौ कल्पना माळी यांचे पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांनी पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. तर शाहीर कल्पना माळी यांच्या समवेत मार्शल भोरे,मारुती ऐंवळे,रवींद्र ऐवळे,दत्तू राडे,आशाताई सुर्यवंशी,शोभा हवालदार यांनी हा पोवड्याचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये अनुसूचित जातीच्या समाज घटकासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना पोवड्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवील्या.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण