हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अन्यथा महामार्ग रोखणार!

प्रसंगी महामार्ग प्राधिकरण च्या कार्यालयाला टाळे ठोकणार

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचा प्रांताधिकार्‍यांना इशारा

मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा हे ठिकाण अपघातांच्या मालीकेची जागा ठरलेली आहे. महामार्गाच्या निर्मिती पासून आजपर्यंत झालेल्या विविध अपघातामध्ये ९/१० माणसे मृत्यूमुखी पडलेली आहेत. काहीवेळा मोठे कंटेनर पलटी होतांना अनेक माणसे केवळ सुदैवाने बचावलेली आहेत. दि.०२/०२/२०२५ च्या पहाटे ह्याच वळणावर एक काचा भरलेला कंटेनर पलटी होवून त्यातील दोन्ही व्यक्ती केवळ सुदैवाने वाचल्या आहेत. तसेच अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने माणसांची वर्दळ नव्हती म्हणून मनुष्यहानी टळली आहे.
गेली ४ वर्षे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत अनेक वेळा ह्या ठिकाणी डांबराचे छोटे गतिरोधक घालणे, मोठ्या अक्षरात वळणदर्शक फलक लावणे व हायमॅक्स बसविणे ह्या मागण्या केलेल्या आहेत. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत. आंदोलनाच्या वेळी वेळ टळून 02/20ण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन देतात. त्यानंतर प्रत्यक्षात काहीही उपाय कणकवली उपविभाराजापूर येथे महामार्गावर जसे छोटे गतिरोधक घातलेले आहेत. तसे ते टाळणेसाठी या ब्रीजच्या अगोदर व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गतिरोधक घालावेत जेणेकरुन वाहनांची गती अपघात होणार नाहीत. तसेच वळणावर हायमॅक्स बसवावा जेणेकरुन रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या वळण सहज नजरेत येईल. त्यामुळे वाहन चालकांना सावधगिरी बाळगता येईल. यापुढे अपघात होवून कोणीही मृत्यूमुखी पडल्यास महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ३०२ कलमाअंतर्गत कारवाई व्हावी ही आमची आग्रही मागणी आहे.
सदर बाबतीत एक महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने महामार्ग नोटीस देवून बंद करणेत येईल. तसेच प्राधिकरणा-च्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याप्रमाणे संबंधितांना सूचना देवून उचित उपाययोजना करणेत यावी. व लोकांच्या जिवीतास धोका असलेली टांगती तलवार थांबवावी अशी विनंती आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह सरचिटणीस सावळाराम अनावकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर प्रांतिक सदस्य विलास गावकर, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, केदार खोत शहराध्यक्ष इमरान शेख, सचिव मुस्ताक काझी, कृष्णा गावकर प्रथमेश गोसावी, प्रेमानंद नाईक सूर्यकांत नाईक, अशोक पेडणेकर विजय तेजम, प्रकाश पालव किशोर तेली, संतोष गावकर, चंद्रकांत मेस्त्री, श्रद्धा गावकर स्नेहा गावकर, संजना गावकर क्षमा कामत, दर्शना घाडीगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!