जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत नडगिवे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

तायक्कांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायक्कांदो स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 4 कास्य पदके मिळवली आहेत.
हि स्पर्धा कणकवली येथील नगरपंचायत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये दिनांक 2 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेत खालील विद्यार्थांनी पदके मिळवली.
मुले. कॅडेट 37 किलो खालील वजनी गट चिन्मय गुरव सुवर्ण पदक, सबजुनिअर 27 किलो वजनी गट हर्षण अडुळकर सुवर्ण पदक, 32 किलो खालील वजनी गट आराध्य सावंत रौप्य पदक, 29 किलो खालील वजनी गटात रेयांश सावकार रौप्य पदक, 23किलो खालील वजनी गटात साई गुरव रौप्य पदक, 38 किलो खालील वजनी गटात अर्णव राणे रौप्य पदक, 29 किलो खालील वजनी गटात अयान काझी कास्य पदक, 27 किलो खालील वजनी गटात वेद कदम कास्य पदक, 32 किलो खालील वजनी गटात अफान काझी रौप्य पदक, तसेच मुलींमध्ये 22 किलो खालील वजनी गटात आमना गिरकर हिने कास्य पदक पटकावले.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व तायक्कांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे, अमोल चौगुले, सुयोग राजपकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडवेगिचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे,सेक्रेटरी मोहन कावळे, सह सचिव राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार परवेज पटेल, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक निलम डांगे, ओंकार गाडगीळ, तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.