फोंडाघाट चेक पोस्टवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे पंढरपूरच्या दिशेने जाणारी महिला सापडली

फोंडाघाट चेक पोस्टवरील उमेश कदम, नितीन बनसोडे या पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता
कणकवली तालुक्यातील शिरवल येथील एक विवाहित सुमारे 32 वर्षीय महिला फोडाघाट चेक पोस्ट येथे पंढरपूर येथे जाण्याचा रस्ता कोणता आहे असे विचारण्यासाठी गेली असता पोलिसांना तिच्या एकूण वागण्यावर व बोलण्यात संशय आल्याने या ठिकाणी ड्युटीवर कार्यरत असणारे पोलीस उद्देश कदम व नितीन बनसोडे यांनी तिच्याकडे उलट सुलट चौकशी केली. या दरम्यान तिच्या हातातील एसटीच्या तिकिटावरून तिच्या गावातील पोलीस पाटील सुशील तांबे यांच्याशी संपर्क साधला व सदर महिला ही ओळखीची आहे का? यावर विचारणा केला असता तिचे नाव मनस्वी मनोज वराडकर असून ती सकाळी आठ वाजल्यापासून गावातून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना सदर महिलेची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत अधिक विचारणा केली व त्यावरून ही महिला या ठिकाणी या स्थितीतूनच पोहोचल्याचे प्राथमिक निष्कर्षा पर्यंत पोलीस पोचले. त्यानंतर या महिलेचे वडील व पोलीस पाटील हे चार चाकी घेऊन येत तिला या पोलिसांकडून ताब्यात घेतले. फोडाघाट चेक पोस्ट वरील पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.