एसटी भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली चक्काजाम आंदोलन

कणकवली बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी धरल्या रोखून

शासनाने भाव वाढ कमी करावी अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करणार

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक यांच्या सहित शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा

एसटीच्या भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या सहित शिवसेना नेत्यांनी दिला. यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कणकवली बस स्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा. यासह अन्य प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या. यावेळी या आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही लाड यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकासमोर बस स्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एसटी रोखून दरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल देखील वाटण्यात आल्या. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. जर प्रवाशांना सुविधा मिळत नसतील व बस स्थानकामध्ये सोयी सुविधा नसतील स्वच्छतागृह चांगले नसेल तर भाडेवाढी चे कारण काय. भाडेवाढीच्या नावाखाली महायुती सरकार जनतेला व प्रवाशांना वेठीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचेही यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तात्या निकम, युवा सेना विभाग प्रमुख किरण वरदम, सचिन सावंत, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, तेजस राणे, आदित्य सापळे, सचिन सावंत, प्रमोद सावंत, प्रसाद अंधारी यांच्यासहित वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!