सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अनंत डवंगे

डॉ. मनोज जोशी यांच्याकडील कार्यभार संपुष्टात
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी प्राध्यापक शरीररचनाशास्त्र, डॉ. मनोज जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडील हा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणून प्राध्यापक शल्य चिकित्साशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग चे डॉ अनंत डवंगे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. डवंगे यांनी आपल्याकडील पदाचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळण्याची सूचना शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे उपसचिव यांनी आदेशाद्वारे दिले आहेत.