चिंदर अपराजवाडी येथे 2 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता घट स्थापना करुन सप्ताहाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपर्यंत सप्ताह सुरु राहणार आहे. यानंतर मंगळवारी ४ नोव्हेंबर ला सकाळी ब्राह्मण देव मंदिरात होम आणि श्री देवी पावणाई मंदिरात महाप्रसाद ५ नोव्हेंबर ला श्री ब्राह्मणदेव मंदिरात सायंकाळी ७ वाजता त्रिपोरी उत्सव, ७ नोव्हेंबर ला वाघबीळ येथे डाळप, ८ नोव्हेंबर ला सकाळी काला आणि सायंकाळी सत्यनारायणाची महापूजा रात्री ९ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अपराजवाडी कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!