शेत विहिरीत पडलेल्या गव्याला गिरोडेत जीवदान

गिरोडे येथे शेत विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान देण्यात आले पोलिस पाटील गिरोडे यांनी सदाशिव मनोहर गवस यांच्या शेत विहिरीमध्ये गवा पडल्याची माहिती वन विभागास दिली . वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनपाल संग्राम जितकर, वनरक्षक उमेश राणे , विश्राम कुबल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने वाट करुन विहिरीत पडलेल्या गव्यास सुस्थितीत बाहेर काढले.त्यानंतर गवा आपोआप नैसर्गिकअधिवासात निघून गेला.

error: Content is protected !!