तिलारीत आता ५ हत्तींचा वावर

एकटा फिरणारा टस्कर तिघांच्या कळपात

तिलारी खोऱ्यात आता ५ हत्तींचा वावर आहे.सुरवातीला एक टस्कर अनेक गावात फिरत होता.त्यानंतर आणखी एक टस्कर दाखल झाला.त्यानंतर एक मादी आणि दोन मध्यमवयीन पिलांचा कळप दाखल झाला आहे.तिलारी खोऱ्यात कालपरवा पर्यंत दोन्ही टस्कर ( स्थानिकांच्या भाषेत गणेश आणि बाहुबली ) एकटे फिरत होते.त्यातील बाहुबली निडर आणि आक्रमक आहे.तर गणेश बाहुबली पेक्षा वय आणि ताकदीने लहान आहे.गेले काही दिवस त्यांचा वावर घाटिवडे, बांबर्डे, हेवाळे, वीजघर,केंद्रे परिसरात आहे. ड्रोनच्या माध्यमातून वनविभाग त्यांचा ठावठिकाणा मिळवत असले तरी हत्ती पहाटे कधी गायब होतात त्याचा मात्र शोध लागत नाही.
सध्या मादी आणि मध्यम वयीन दोन पिलांच्या कळपात या दोघांमधील एक टस्कर जाऊन मिळाला आहे.त्यामुळे एकीकडे चार आणि एकीकडे एक असा त्यांचा वावर सुरु आहे.

सौर ऊर्जा कुंपण आणि आगळीक

वन खात्याने हत्तींना रोखण्यासाठी तिलारी वीजघर मार्गाच्या बाजूला सौर ऊर्जा कुंपण घातले आहे.अनेक ठिकाणी हत्तींना सहज येण्याजाण्यास जागा मोकळी असली तरी, काही ठिकाणी काही स्थानिक ग्रामस्थांनी सौर कुंपणाच्या तारा गुंडाळून वर ठेवल्याचे सोमवारी निदर्शनास आले आहे. त्या तशा ठेवू नयेत असे वनविभागाने आवाहन केले आहे.तथापि, या कुंपणाचा उपयोग हत्तींना रोखण्यास कितपत उपयोगी ठरणार आहे हाही मुद्दा आहेच.

error: Content is protected !!