यतीन खोत ,मंदार केणी, दर्शना कासवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाला मालवण मध्ये धक्का, नगरसेवकांनी केला भाजप प्रवेश

मालवण मधील तीन नगरसेवकांनी आज ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यतीन खोत, मंदार केणी, दर्शना कासवकर आणि भाई कासवकर असे चौघेजण आज भाजपमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आज सकाळी प्रदेश कार्यालयात हा प्रवेश झाला आहे. केनी ,खोत आणि कासवकर यांच्या प्रवेशामुळे मालवणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात मालवण नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत .या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

error: Content is protected !!