मोबाईल आणि इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी करावा – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज गुणवंत सत्कार सोहळा संपन्न

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आणि या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा .
आपल्या करिअरची ध्येयनिश्चिती करून ते ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे राज्य अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.
क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज मुंबई, संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने रविवार समाजातील इयत्ता १०वी/१२वी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात/ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात घनश्याम गांवकर बोलत होते . या गुणगौरव कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष घनःश्याम गांवकर. उपाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मण घाडीगांवकर, मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य /पत्रकार विजय गांवकर , जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, सुनील गांवकर , आडेलकरगुरुजी, कळसुलकर गुरुजी आदी मान्यवर सभा मंचावर उपस्थित होते.
पत्रकार विजय गांवकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , पुढील काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय चा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहिले पाहिजे. आगामी काळात आपल्याला कोणत्या क्षेत्रांमध्ये भविष्य घडवायचे आहे याची सांगोपांग माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायला हवी आणि तशा तऱ्हेने आपल्या भवितव्याचा विचार करायला हवा. यावेळी सूर्यकांत घाडी , आडेलकर गुरुजी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या गुणगौरव सोहळ्याला संभाजी घाडीगांवकर, सत्यवान घाडीगांवकर, विजय घाडी ,सुभाष गांवकर, जगन्नाथ गांवकर, दत्तगुरु गांवकर, कैलास गांवकर, प्रवीण घाडीगांवकर,
सौं. प्रीतम घाडीगावकर, डॉ. प्रमोद घाडीगावकर, सदानंद घाडीगावकर , भिसाजी घाडीगावकर , अशोक घाडीगावकर सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!