आचरा रामेश्वर मंदिरात सूर्यनमस्कार सेवेला उस्फुर्त प्रतिसाद
वेदशाळा, शाळकरी विद्यार्थी, स्त्री षुरुष आबालवृद्ध झाले सहभागी
सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे सूर्यदेवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे. आज आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात मकर संक्रांतीचे औचित्य साधून देवस्थान समिती व ऋग्वेद गुरुकुल वायंगणी वेदमूर्ती श्री मुरवणे गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर मंदिरात सुर्य नमस्कार सेवेचे आयोजन करण्यात आले होते याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला यावेळी वेदशाळेतील विद्यार्थी, शाळकरी मुले, महिला जेष्ठ या सूर्यनमस्कार सेवेत सहभागी झाले होते यावेळी सहभाग घेतलेल्या प्रत्येकाने 62 सूर्यनमस्कार घातल सेवा बजावली.
या कार्यक्रमाची सुरवात ही श्रीदेव रामेश्वर चरणी रुद्राभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक व सुर्योपासनेचे महत्व ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी विषद केले, न्यू इंग्लिश स्कुल आचरा, इंग्लिश मिडीयम स्कुल आचराचे विद्यार्थी, त्रिनेत्र जिम फिटनेस सेंटरचे सभासद तसेच गावातील स्त्री षुरुष आबालवृद्ध शाळकरी मुलेही सुर्य नमस्कार सेवेमध्ये सहभागी झाली होती.