“कृत्रिम बुद्धिमत्ता”;कणकवली व्यापारी संघ आयोजित व्याख्यानास उदंड प्रतिसाद

:अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान
कणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने “कृत्रिम बुद्धिमत्ता”; आधुनिक तंत्रज्ञान संधी व आव्हाने या विषयावर यावर्षी सुप्रसिद्ध लेखक व संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी आयोजित केले होते. त्यात अच्युत गोडबोले यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्याचे मूलभूत तत्त्व समजावून सांगितले. तंत्रज्ञानाचा इतिहास, सध्याची प्रगती, आणि भविष्यातील शक्यता यांचा आढावा घेतला . कृत्रिम बुद्धिमत्ता ही कस कशी विकसित झाली आणि ती मानवजातीसाठी किती महत्त्वाची आहे; त्यानुसार आत्ताच्या पिढीने याचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे; ती आत्मसात केली पाहिजे त्याचे महत्त्व पटवून सांगितले.
कंप्युटर सायन्स, सांख्यिकी आणि न्यूरोसायन्स यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी असलेला संबंध स्पष्ट करताना मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, बिग डेटा यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांची मांडणी सोप्या भाषेत उदाहरणांसह; याची व्यावहारिक अंमलबजावणी कशी होते याचे विवेचन थोडक्यात केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोग आपल्याला आरोग्यसेवा, उद्योग, शिक्षण, वाहतूक, कृषी, वित्तीय सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशी क्रांती घडवते हेही स्पष्ट केले .
AI चा मानवी जीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव, AI च्या वापरासोबत निर्माण होणाऱ्या नैतिक आणि सामाजिक आव्हानांवर चर्चा केली.
गोपनीयता, निर्णयक्षमता, आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात कशी आकार घेईल याचा अंदाज ते बोलताना मांडत होते . याचा मानवी जीवनावर होणारा दीर्घकालीन परिणाम आणि त्यासाठी आवश्यक तयारी आत्ताच्या पिढीने करणे गरजेचे आहे त्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक विषयाची सखोल माहिती, विषयाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने मांडली. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगतीत येणारी आव्हाने फारच सोप्या पद्धतीने रसिकांना समजून घेता आली आणि ए आय विषयीचा श्रोत्यांच्या मनात एक प्रकारे असलेला न्यूनगंड-गोंधळ कमी व्हायला मदत झाली.
आधुनिक जगात वावरताना सामान्य माणसाला स्वतःमध्ये कोणते अपडेट्स करणे आवश्यक आहे. यासाठी दिशा देणारे हे व्याख्यान होते. या क्षेत्रातील ही सविस्तर माहिती एवढ्या सोप्या पद्धतीने कणकवली व्यापारी संघाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान संधी व आव्हाने या विषयावर जे तज्ञ प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यानातून समजली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाली. एकंदरीतच हे व्याख्यान सामान्यांना वैज्ञानिक दिशा देणारे झालं .