मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला लावला सुरुंग

लोरे नं. २ गावचे उबाठाचे सरपंच विलास नावळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
उबाठाचे तीन ग्रा.पं. सदस्य, चार संचालक, तीन शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथ प्रमुख यांचाही समावेश
लोरे नं. २ गावचे उबाठा सेनेचे सरपंच विलास शिवराम नावळे, उपसरपंच शुभांगी कुडतरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, संचालक, उबाठाचे उपतालुकाप्रमुख, युवा सेना शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, शाखाप्रमुख,अशा असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले.
राज्याचे मत्स्त्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी हा पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये उपसरपंच शुभांगी कुडतरकर, सोसायटी संचालक सुभाष कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता कदम, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिवगण, युवासेना उपतालुकाप्रमुख गुरुराज डोंगरे, युवा सेना शाखाप्रमुख प्रतीक मोरे, बूथ प्रमुख महेंद्र राणम, माजी शाखाप्रमुख दिलीप मांजलकर, युवा सेना शाखाप्रमुख चंद्रकांत नावळे, संचालक किशोर धावरे, संचालक विनोद परवडे, संचालक प्रकाश गोरुले, युवासैनिक विनोद मोरे, शंकर डोंगरे, अनंत आग्रे, यशवंत मांजलकर, संतोष मांडवकर, बाळकृष्ण आग्रे, दत्ताराम कदम, विजय रामाने, जगदीश नराम, दत्तगुरु मांजलकर, संतोष मोरे, महेश कदम, शांताराम कदम, संतोष कदम, गणेश मांजरेकर, दिलीप तर्फे, सत्यवान तर्फे, ओंकार मांजलकर, राजेंद्र कदम, संदीप मांजरेकर, शशिकांत बडेकर, समीर अग्रे, नंदकुमार डोंगरे, केदार नावळे,प्रदीप मांजलकर, बाबाजी पाष्टे, किरण तर्फे, सहीर कुडतरकर, संतोष मिस्त्री, मारुती मांजलकर, अंकुश नेमण, अनिल मांडवकर, एकनाथ कुडतरकर, वनिता मटकर, सुरेखा काशीराम शिवगण, लक्ष्मी दर्डे, विजय नेमन, सुहास दरडे, लक्ष्मण कुडतरकर, सिताराम मांजलकर, रामचंद्र कुडतरकर, दीपक कुडतरकर, सिताराम नेमन, मनोहर दरडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी वैभववाडी भाजप कार्यालय समोरील पटांगणावर हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.