खारेपाटण ग्रामपंचायतीचा वेंगुर्ले येथे अभ्यास दौरा संपन्न

सुमारे ४० बचत गटातील महिलांचा सहभाग
विविध प्रकल्प उद्योगांना दिल्या भेटी
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या सरपंच सौ.प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली गावातील सुमारे ४० बचत गटाच्या महिलांचा सहभाग असलेला एकदिवसीय अभ्यास दौरा नुकताच जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे संपन्न झाला.
यावेळी खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य श्री सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,किरण कर्ले, सौ शितीजा धुमाळे,मनाली होणाळे, अमिषा गुरव,धनश्री ढेकणे,दक्षता सुतार,अस्ताली पवार तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमेदच्या सी टी सी सौ आस्था पाटणकर बचत गटाच्या सी आर पी श्रीम.युती पोमेडकर,सौ सायली तुरळकर,सौ सुतार यांसह गावातील महिला आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या दौऱ्यात सहभाग घेतला होता.
खारेपाटण ग्रामपंचायत फंडाच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय अभ्यास दौऱ्यात ग्रामविकास अधिकारी श्री जी.सी. वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शना खाली खारेपाटण गावातील ४० बचत गटाच्या प्रमुख दोन महिला पदाधिकारी यांसह बचत गटाच्या प्रमुख सी टी सी महिला मिळून एकूण ६० महिलांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता. तर खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने या अभ्यास दौऱ्यासाठी महिलांसाठी एकूण २ एस टी बसेससह नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या अभ्यास दौऱ्यात वेंगुर्ले येथील फळ संशोधन व प्रक्रिया केंद्र,ग्रामपंचायत परुळे, परुळे बाजार मधील प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प,कोकोपीठ व कात्या उद्योग आदींना भेटी देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.तसेच येथील बचत गटातील उद्योग करणाऱ्या महिलांनी छोटे उद्योग कसे उभे करावे याबाबत माहिती दिली.तसेच वेंगुर्ले येथील प्रसिद्ध फळ संशोधन केंद्राला व तेथील नर्सरीला भेट देऊन कृषी विषयक अभ्यासपूर्ण माहिती खारेपाटण च्या बचत गटातील महिलांना दिली.
यावेळी परुळे ग्रामपंचायतीच्या वतीने अभ्यास दौऱ्या निमित्त आलेल्या खारेपाटण सरपंच श्रीम.प्राची ईसवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी परुळे सरपंच अमडपाल माजी सरपंच तसेच ग्रामसेवक श्री शिंदे स्वच्छ्ता दुत श्रीम.प्रेमाताई व येथील डी सी आर पी यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले.तसेच अभ्यास दौरा यशस्वी झाल्याबद्दल अभ्यास दौऱ्यात सहभागी बचत गटातील महिलांनी खारेपाटण ग्रामपंचायतीचे आभार मानले.