भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या मागणीला यश

कणकवली शहरातील कनकनगर, मराठा मंडळ जवळील केटी बंधाऱ्यांना प्लेट लावण्याचे काम मार्गी

मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे वेधले होते लक्ष

कणकवली शहरात भविष्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये याकरता शहरातील दोन्ही केटी बंधाऱ्यांना प्लेट लावण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी काही दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती. तसेच याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे देखील लक्ष वेधले होते. अखेर श्री कोदे यांच्या मागणीला यश आले असून कणकवलीतील कणकनगर व मराठा मंडळ जवळील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवण्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. यामुळे नदीपात्रात पाणी साठून राहणार असून येत्या काळात कणकवली शहरातील उन्हाळ्याच्या दिवसात भासणारी तीव्र पाणीटंचाई आता कमी होणार आहे.

error: Content is protected !!