खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ मध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी या जयंती निम्मित शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका दीन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला जि.प. केंद्रशाळा नं.१ व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी,शाळेचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर, अंगणवाडी सेविका श्रीम मोहिरे मॅडम,मदतनीस सौ राऊत मॅडम शाळेच्या शिक्षिका श्रीम.अलका मोरे,आरती जोजण,अबिदा काझी,शाळेचे शिक्षक श्री मिलिंद सरकटे,श्री धुमक सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर छान सुंदर भाषणे सादर केली. शाळेच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तर सावित्रीबाई फुले जयंती बालदिन म्हणून साजरा करत असताना शाळेतील मुलींना विविध कला गुणांचे वक्तृत्व,नृत्य व अभिनय आदी कार्यक्रम सादर केले.यावेळी शाळेचे शिक्षक श्री मिलिंद सरकटे व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तसेच शाळेचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित विद्यार्थ्यांना अनमोल अशी अभ्यासपूर्ण माहिती दिली.तर शाळेच्या अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीम राऊत मॅडम यांनी केले.तर सर्वांचे आभार श्री आरती जोजन मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!