डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे फौंडेशन च्या माध्यमातून क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना पाच लाखाची मदत.

धनादेश सुपूर्त करताना डॉ.प्रदीप ढवळ तसेच अन्य पदाधिकारी.

कणकवली/मयूर ठाकूर.

भारताचे क्रिकेटपटू श्री.विनोद कांबळी यांच्यावर ठाणे येथील अंकुर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती.त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांना अंकुर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेतली होती.विविध संथा संघटनांच्या माध्यमातून देखील विनोद कांबळी यांना मदत दिली जात आहे.नुकतीच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी देखील भेट घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भेट घेण्यास पाठविले,तसेच डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे फॉउंडेशन च्या माध्यतून पाच लाख रुपये मदत आपणास उपमुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांना कळविले.तसेच यापुढील आयुष्यभर सर्वोतपरी लागणारे उपचार आणि त्यासाठी येणारा खर्च आम्ही उचलू असे सांगितले होते.तसेच वानरसेनेच्या माध्यमातून देखील मदत मिळवून देण्याचे आश्वासित केले होते.
याच पार्श्वभूमीवर नुकताच डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे फौंडेशन च्या माध्यमातून विनोद कांबळी यांना पाच लाखांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.प्रसंगी लेखक,दिग्दर्शक, साहित्यिक,कादंबरीकार,कोमसाप चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि फॉउंडेशन चे पदाधिकारी असलेले डॉ.प्रदीप ढवळ आणि फौंडेशन चे अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!