खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटणच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ संपन्न…

सोशल मीडियाचा अतिरेक होत असताना दिसत असून सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेल असे नाही.त्याचा आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वकच सोशल मीडिया चा वापर करावा.’ असे भावपूर्ण उदगार कोकणी ‘रान माणूस ‘ फेम प्रसाद गावडे यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय व ज्युनियर व सिनियर कॉलेज खारेपाटण च्या संयुक्तिक शालेय विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, सुप्रसिध्द मालवणी कवी गायक दादा मडईकर,संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे,सचिव – महेश कोळसुलकर,संस्थेचे संचालक श्री दादा कर्ले,राजेंद्र वरुणकर,संदेश धुमाळे,प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, मोहन कावळे,विजय देसाई,प्रशांत गुळेकर,दिगंबर राऊत,गुरुप्रसाद शिंदे,योगेश गोडवे,सामाजिक कार्यकर्ते श्री नंदू कोरगावकर,मंगेश गुरव,संतोष पाटणकर,ऋषिकेश जाधव,केळवली सरपंच सौ अक्षता चव्हाण आणि हायस्कूलच्या सेवा निवृत्त माजी शिक्षिका सौ स्वप्नाली कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून व संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पेंढारकर सर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालवणी कवी दादा मडईकर व खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.तर आज वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा शुभारंभाचा पहिला दिवस असल्याने प्राथमिक विभगाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.तर गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खारेपाटण शिक्षण संस्थेचे दी.२६ डिसेंबर २०२४ ते ३०डिसेंबर २०२४ पर्यंत सलग वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम चालणार असून दी.२७ डिसेंबर २०२४ रोजी माध्यमिक विभाग दी.२८ डिसेंबर ज्युनियर कॉलेज विभाग दी.२९ डिसेंबर माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम तर दी.३० डिसेंबर २०२४ रोजी सिनियर कॉलेज सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम सादर होणार असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हे कार्यक्रम घेत असल्याची माहिती खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी आपल्या मनोगतात दिली.
पुढे बोलताना प्रसाद गावडे म्हणाले “कोकणातील मातीची घरे व येथील सांस्कृतिक वारसा तसेच वनौषधी वनस्पती तसेच कोकणी रान मेवा याची जपणूक आपण केल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.तर शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणात स्थानिक जीवन कलेची ओळख निर्माण करून दिली पाहिजे.आज कोकणातील माणसांवर रेशनचा तांदूळ खाण्याची पाळी यावी.हे आमच्या शेतीप्रिय कोकणी माणसाचे दुर्दैव आहे.सोशल मीडियाचा वापर निसर्ग संपन्न कोकणातील चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी करा असे देखील शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडईकर यांनी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात रंगत आणत मालवणी कविता गायनातून सादर करून रसिकांची मने जिंकली.यावेळी त्यांनी ‘पळस फुललो मनात ‘
‘तारया मामा,तारया मामा.. होडी हाड रे..’ लय दिसानी जावय इलो..’
‘मन लाटांमध्ये चिंब,मन बुडणारे बिंब ‘ तू पावस मी पावस… पावस भरान ईलो..’ अशा शानदार मालवणी कविता सादर केल्या.तर दयानंद पेडणेकर यांनी गायन व मनोरंजनात्मक खेळाचे सादरीकरन करून विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढविली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी करून शाळेच्या आज पर्यंतच्या एकूण शैशनिक काम काजाचा विकसित प्रगतीचा आढावा घेतला.यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास शुभेछा दिल्या.तर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत यांनी करून दिला.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक श्री निलेश पवार यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ प्राजक्ता कोकाटे मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!