खारेपाटण व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने मंत्री नितेश राणेंचे स्वागत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री राणे यांचे केले जल्लोषी स्वागत
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 22डिसेंबर रोजी दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.खारेपाटण व्यापारी असोसिएशन याच्या वतीने मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रांजल कुबल,राजू वरुणकर,श्री धाक्रस, प्रशांत गाठे, वीरेंद्र चिके व अन्य खारेपाटण व्यापारी उपस्थित होते.