खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने मंत्री नितेश राणेंचे स्वागत
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री राणे यांचे केले जंगी स्वागत
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 22डिसेंबर रोजी दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.खारेपाटण ग्रामपंचायत च्या सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंत्री राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्यात येणार असल्याने त्याच्या स्वागताची दमदार तयारी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे मंत्री राणे यांच्यावर 51जेसीबी, दोन क्रेन मधून पुष्पवर्षाव करण्यात आला. ढोल ताश्याच्या गजरात राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव, सदस्य -मनाली होनाळे,क्षितिजा धुमाळे, गुरुप्रसाद शिंदे,किरण कर्ले,जयदीप देसाई,दक्षता सुतार,सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार,व इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.