चिंचवली विभाग भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या वतीने मंत्री नितेश राणेंचे स्वागत
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 22डिसेंबर रोजी दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.चिंचवली विभाग शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.