कणकवलीत प्रथमच गीत रामायण” कार्यक्रमाचे आयोजन
बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे निमित्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच गीत रामायण कार्यक्रम आपल्या कणकवलीत होत आहे.बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्सव – ‘पदन्यास २०२४’ या कार्यक्रमानिमित्त
गीतरामायण हे नृत्यनाट्य मोफत पाहायला मिळणार आहे ज्याचे सादरीकरण सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे (ऋतुजा नृत्यालय, पालघर) आणि त्यांचा ग्रुप करणार आहेत.
बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली, येत्या २४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘पदन्यास २०२४’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी
“पदन्यास” हा विद्यार्थ्यांच्या पावलांनी साकारलेला नृत्याचा प्रवास आहे. यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक भारतीय नृत्यशैलींसह समकालीन नृत्यशैलींच्या माध्यमातून आपल्या कला-कौशल्याचे सादरीकरण करणार आहेत. ताल, लय, मुद्रा आणि हावभाव यांचा अनोखा संगम या नृत्यांमध्ये दिसून येईल.
गीत रामायण या कार्यक्रमानिमित्त रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांचे नृत्याद्वारे सादरीकरण करण्यात येणार असून रामजन्म, सीतेचे स्वयंवर, वनवास, रावण वध आणि रामराज्याभिषेक या प्रसंगांवर आधारित नृत्य, संगीत आणि अभिनयाचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळणार आहे.
अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था आणि बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने सर्व पालक, नागरिक आणि हितचिंतकांना या भव्य सांस्कृतिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.