सामाजिक कार्यकर्ते, कट्टर राणे समर्थक रफिक नाईक यांनी केले मंत्री नितेश राणेंचे स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री राणे यांचे जंगी स्वागत

राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 22डिसेंबर ला दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते,कट्टर राणे समर्थक रफिक नाईक यांच्या सौजन्याने असलेला भव्य असा पुष्पहार सर्वांसाठी आकर्षक ठरत होता.रफिक नाईक त्यांच्या सौजन्याने भव्य अश्या पुष्पहाराने आमदार नितेश राणे यांचे दमदार स्वागत करण्यात आले.रफिक नाईक यानी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मंत्री नितेश राणे यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

error: Content is protected !!