घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जेईई, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकॅडमीचे संचालक श्रीनिवास कोंडुती (वासू सर) यांच्या हस्ते झाला .
यावेळी अकॅडमीचे सेंट्रल झोनल हेड श्रीधर गुप्ता,राहुल पाडळकर,नागेंद्र राव ,सुनील हराळे व स्टाफ उपस्थित होता.
जेईई, नीट व सीईटी परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा या अकॅडमी ने जपली आहे. कोल्हापूर शाखेच्या 20 विद्यार्थ्यांनी जेईई – नीट -2022 या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमीचे प्रणव सुतार ( आयआयटी जम्मु), हर्षवर्धन शिंदे (सीओएपी पुणे), सिद्धेश धनलोबे( गव्हर्नमेंट कॉलेज कराड) , परेश जैन (एस जी आर ए सोलापूर) राज ओसवाल (के व्ही टी आर ए धुळे)वैष्णवी जाधव ( के ए एम सी एच संकेश्वर) या ठिकाणी प्रवेश मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक वासू सर म्हणाले, की आजवर उच्चांकी निकालाच्या जोरावर पालकांचा व विद्यार्थ्यांचा विश्वास आम्ही सार्थ ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफ ने दिलेले योगदान याच्या जोरावरच हे यश मिळाले आहे.यापुढेही या अकॅडमीची यशस्वी वाटचाल चालू राहील याचा उपस्थितांना विश्वास दिली.
अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडवत, विश्वस्त विनायक भोसले यांनी या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!