बी आय डी एफ च्या माध्यमातून औद्योगिक विकास शक्य : संजय घोडावत
जयसिंगपूर: बिझनेस अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फोरम (बी आय डी एफ)यांच्या वतीने मेंबरशिप डेव्हलपमेंट कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी अध्यक्ष संजय घोडावत यांनी सांगली- कोल्हापूर परिसराचा औद्योगिक विकास फोरमच्या माध्यमातून करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष अण्णासाहेब चकोते आणि परिसरातील 150 उद्योग व्यावसायिक उपस्थित होते. सचिव महेंद्र परमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर खजिनदार महेश सारडा यांनी बी आय डी एफ चे सभासद होण्याचे फायदे सांगितले.
रोटरी इंटरनॅशनल चा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय घोडावत यांचा तर चकोते ग्रुपच्या नवीन प्लांट चे नुकतेच उद्घाटन झाल्याबद्दल अण्णासाहेब चकोते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या संचालक पदी फेर निवड झाल्याबद्दल महेंद्र परमार यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना घोडावत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व या भागाची उन्नती होण्यासाठी चांगले रस्ते व पायाभूत सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.सदस्य वाढीसाठी, एकमेकांची ओळख होण्यासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी इलेक्ट्रॉनिक डिरेक्टरी व ॲपचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तर चकोते यांनी बी आय डी एफ ची स्थापना, हेतू,उद्दिष्ट आणि विकासाबद्दल माहिती दिली.
उपस्थितांचे आभार मानताना कार्यकारी सचिव विनायक भोसले यांनी बी.आय.डी.एफ ची चळवळ पुढे नेण्याचे सर्वांना आवाहन केले. यावेळी शाहू इंडस्ट्रियल इस्टेट, अकिवाटे इंडस्ट्रियल इस्टेट आणि जयसिंगपूर परिसरातील उद्योजक व संचालक अरुण भाई शहा, राजेश शहा, राजीव पारीख,प्रकाश मेहता, युवराज शहा,अमोद कुलकर्णी उपस्थित होते.