आंबा नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तहसीलदारांकडे मागणी
सध्या झालेल्या वातावरण बदलामुळे आमच्या परिसरातील पर्यायाने तालुक्यातील काजू,आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमच्या परिसरात काजू हे मुख्य उदरनिर्वाहाचे उत्पादन पीक आहे.परंतु यावर्षी चांगला मोहोर येवूनही सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना झाला आहे.. पर्यायाने काजू आणि आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तरी याकडे लक्ष देवून पिक नुकसान पाहणीचे आदेश तथा पंचनामे करण्याचे आदेश देवून शासन दरबारी नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशीत करावे. अशी मागणीयावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खारेपाटण विभागप्रमुख बाळा राऊत, हरकुळ विभागप्रमुख अविनाश सावंत आदी उपस्थित होते.





