ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन

कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद उर्फ कोकी भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. शहरात ते ‘कोकि’ या नावानेही ओळखले जात. कांबळे गल्ली येथील बाळ गोपाळ हनुमान मंदिरातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. तसेच स्थानिक राजकारणातही ते कार्यरत होते.
वैभव नाईक (कुडाळ-मालवणचे माजी आमदार) यांचे ते कट्टर समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. युवक कल्याण पतसंस्थेच्या पिग्मी एजंट वैभवी पाटकर यांचे ते पती होत. गुरुवारी दुपारी कणकवलीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





