‘धनंजय फाउंडेशन’च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स

कणकवली येथील धनंजय फाउंडेशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
धनंजय फाउंडेशनच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शैक्षणिक परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कणकवली तेलीआळी येथील धनंजय फाउंडेशनच्या मार्गदर्शन वर्गाच्या ठिकाणी आयोजित या गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाच्यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, पत्रकार सुधीर राणे, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक जाधव,प्रशांत बोभाटे, डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा विभागाचे सत्यवान गावकर, धनंजय फाउंडेशनचे मार्गदर्शक प्रदीप मांजरेकर, शिक्षिका सारिका काणेकर, सोनल चव्हाण तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी ५वी गुणवत्ताधारक विद्यार्थी इरा नागवेकर, अर्णव आपटे (सीबीएससी बोर्ड), अस्मिता गोसावी, पुष्कर महाडिक, पद्मज महाडिक( मराठी माध्यम), परी सांडव, दुर्वांक नाईक, वेदांत गुरव, राजवी पालव ( इंग्रजी माध्यम).
८वी गुणवत्ताधारक विद्यार्थी मयंक महेश चव्हाण. कुणाल मेस्त्री, राज्ञी हर्णे (सीबीएससी बोर्ड ) यश पवार, चेतन भोगटे, जीवल साटम, दुर्वा ठाणेकर, वरद तवटे ( इंग्रजी माध्यम) संतोषी आळवे, अर्थव सावंत (मराठी माध्यम),
१०वी गुणवत्ताधारक अनोन्य तांबे ९८ टक्के गुण , पार्थ राणे ९७.८० टक्के गुण (इंग्रजी माध्यम) तसेच अन्य गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्सही दिल्या.

error: Content is protected !!