खासदार राऊत आणि आमदार नाईक यांच्यामधील शीतयुद्ध बॅनरबाजीवरून उघड

भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांचे वक्तव्य

कुडाळ : खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यामधील शीतयुद्ध बॅनरबाजीवरून उघड झाले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गावर लावलेल्या बॅनरवर आमदार वैभव नाईक यांचे छायाचित्र नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले की, खासदार विनायक राऊत यांना या मतदारसंघात आपल्या मुलीला उमेदवारी द्यायची असल्यामुळे आता वैभव नाईक यांची छायाचित्रे गायब करायला सुरुवात केली आहे असे त्यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा सिंधुदुर्ग शिवसेनेच्या बॅनरवर खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांची छायाचित्र लावलेले नाही. आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू असल्यामुळे बॅनर बाजीवरून त्याला पुष्टी मिळत असून या दोघांमधील शीतयुद्ध सुद्धा उघड झाले आहे. याबाबत भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले की, खासदार राऊत आणि आमदार नाईक यांच्यामध्ये मागील अनेक वर्ष सुरू आहे. त्यात खासदार राऊत यांना आपल्या मुलीला या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणायचा आहे आणि आता तर शिंदे गटाशी जवळीक आमदार वैभव नाईकांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या बॅनरवरून आमदार वैभव नाईक यांचे छायाचित्र गायब केले आहे. तसेच भविष्यकाळात आमदार वैभव नाईक अन्य पक्षात दिसतील एवढे खरे असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!